राष्ट्र सेवा विद्यालय येथे शिक्षक दिना निमीत्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
----------------------------------------------------------------------
राष्ट्र सेवा विद्यालय येथे शिक्षक दिना निमीत्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
----------------------------------------------------------------------
नागपूर : (दि.5 सप्टेंबर) गुरु ब्रह्मा , गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः|| गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः||
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्याअनुषंगाने नागपूर शहरातील राष्ट्र सेवा विद्यालय - लालगंज येथे “ शिक्षक दिना ’’ निमित्त “ विद्यार्थी सुरक्षा ” दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी मा. सौ. शितल पाटील संस्थापक अध्यक्षा- महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि मा. सौ. राणी कळमकर बाल कल्याण समितीचे समुपदेशिका उपस्थित होत्या. शाळेत शिक्षक दिना निमित्त “विद्यार्थी सुरक्षा” दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे “गुड टच – बँड टच’, समाजात होत असलेले वाईट कृत्य पासून बचाव , स्वसंरक्षण यावर समुपदेशन केले.
कार्यक्रमा दरम्यान अध्यक्षा मा. श्रीमती शितल पाटील यांनी मुली असो कि मुले यांचे समाजात होत असलेले लैंगीक शोषण यावर समुपदेशन केले व यामधून स्वतःचा बचाव करण्याच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना अवगत करून दिल्या. तसेच कार्यक्रमाच्या अतिथी मा. सौ. राणी कळमकर यांनी समाजात होत असलेल्या अनेक घटनांची माहिती सांगून गुड टच व बॅड टच यावर मार्गदर्शन केले.
शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गजभिये यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षा करण्याबाबत सुचना देऊन पुढील भविष्याकरीता मार्गदर्शन केले. वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी “स्वयंशासन” अंतर्गत शिक्षकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती घाटबांधे व आभार प्रदर्शन- श्री. सी.एम. गमे (सहा. शिक्षक) यांनी केले.