राहुरी कृषी विद्यापीठ कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीचे भविष्य धोक्यात.
राहुरी कृषी विद्यापीठाकडे विविध विभाग विविध योजनांकडे मजुर पुरवठा ठेकेदार कार्यरत असून या ठीकाणी अनेक ठेकेदार मजुर पुरवठा करत आहेत
शासकीय नियमा प्रमाणे मजुरांच्या मासीक वेतनातून १२% इतकी रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करून भविष्य निर्वाह निधी संचालनालयाकडे जमा केला जातो व शासनाचा लाभांश त्यामध्ये जमाकरून ती रक्कम त्या मजुर कामगाराला भविष्यात उपयोगी पडेल यासाठीची तरतूद शासनाने केली असून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत परंतू राहुरी कृषी विद्यापीठाला मजुर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने मजुराचे हाजेरी पत्रकाप्रमाणे वेतन पट बनवून विद्यापीठाकडून देयके मंजूर करून घेऊन वेतनाच्या रक्कमा ताब्यात घेतल्या मात्र बहुतांश ठेकेदाराने कर्मचारी निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधी संचालनालयाकडे जमाच केला नाही
त्यामुळे या ठेकेदारी मजुरांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे
यापूर्वीही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने मजुरांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे बाबत विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही या ठेकेदारांनी अगर विद्यापीठ प्रशासनाने याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष केले
तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा भविष्य निर्वाह निधी ज्या ठेकेदारांनी भरला नाही त्यांचेवरही कधी अंकुश ठेवला नाही अगर त्यांना कधी जाब ही विचारण्यात आला नाही या भविष्य निर्वाह निधीची रक्कम विद्यापीठाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा न केल्याने यापूर्वी या भविष्य निर्वाह निधी संचालनालयाने राहुरी कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या वाहनांच्या जप्तीचे आदेश दिले होते हि बाब राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्य प्रणालीला काळीमा फासनारी असतांना देखील आजही रोजी सदर भविष्य निर्वाह निधी बाबत विद्यापीठाच्या कामगार कल्याण संचालनालयाने अगर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने गांभिर्याने विचारात घेतले नाही
आजही रोजी सदर मजुरांचे P.F. त्यांचे खाते पुस्तकावर दिसून येत नाही सदर भविष्य निर्वाह निधी बाबत व तीन तीन महिने होत नसलेल्या पगाराबाबत मजुरांनी ठेकेदारास विचारणा केल्यास त्यांना कामावरून हाकलुन देण्याची भाषा या ठेकेदारांकडून केली जात असल्याने हे बिचारे मजुर गप्प बसतात
आज रोजी विद्यापीठाकडे १२०० ते १३०० मजुर २६० रू हाजेरीने उन्हातान्हात राबतांना दिसून येत आहेत
मात्र दुसरीकडे विद्यापीठाकडे कायम आस्थापनेकडे असणारे मजुर पदाचे कर्मचारी हे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची हुजरेगीरी - मुजरेगीरी करून बिनकामाचा दामदुप्पट पगार घेत असल्याचे दिसून येत आहेत
हे कायम आस्थापनेवरील मजुर प्रक्षेत्रावर अक्षर:ह झाडाखाली झोपा घेतांना पाहवयास मिळतात तर दुसरीकडे कंत्राटी मजुर अंगावरचा घाम पुसत उन्हातान्हात राबतांना दिसत आहेत
प्रत्यक्षात जे कष्टकरी मजुर पोटाची खळगी भरण्यासाठी अन्याय सहन करून राबत असतांना त्यांचा कंत्राटी पद्धत सूरू झाल्या पासून आज पर्यंतचा भविष्य निर्वाह निधी आपणास कधी तरी मिळेल या आशेने भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेकडे डोळे लावून आशेवर जगत आहेत मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व मजुर पूरवठा ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे या कंत्राटी मजुरांच्या भविष्य निर्वाह निधीचे भविष्यच धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आपला भविष्य निर्वाह निधी बुडतो की काय ?
असे भितिचे वातावरण कंत्राटी मजुरांमध्ये निर्माण झाले आहे.