पूर्णतः नियम व अटींचे पालन करूनच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करा - रामकृष्ण टाकळकर
प्रतिनिधी - नुकतीच बैलगाडा शर्यतीला कायम ची परवानगी मिळाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन ही करण्यात आले आहे नुकतीच खेड तालुक्यातील शिंदे गावात खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या मार्गदर्शनखाली बैलगाडा शर्यत भरवण्यात आली आहे या शर्यतीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे रामकृष्ण टाकळकर उपस्थित होते.बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांनी सर्व अटी व शर्तीचे पालन करावे तसेच बैलांना कुठल्याही प्रकारे इजा होऊन देऊ नये याची काळजी घ्यावी व सर्व बैलगाडा मालकांनी फिटनेस सर्टिफिकेट जमा करूनच बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान रामकृष्ण टाकळकर यांच्या वतीने करण्यात आले.